सौरव गांगुली यांचा मोठा निर्णय; अचानक दिला पदाचा राजीनामा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. वाद टाळण्यासाठी सौरव गांगुलीने आपल्या एका मोठ्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंडियन सुपर लीग क्लब एटीके मोहन बागानच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. RPSG व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या ATK मोहन बागान एफसीने सोमवारी लखनौमध्ये 7,090 कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह नवीन IPL संघाचे हक्क घेतले.

गांगुली यांनी दिला पदाचा राजीनामा
गांगुली यांनी बुधवारी क्रिकबझला सांगितलं की, “मी राजीनामा दिला आहे.’ एटीके मोहन बागान एफसीच्या वेबसाइटनुसार, संचालक मंडळाचे अध्यक्ष संजीव गोयंका यांच्यासोबत संचालक म्हणून गांगुलीच्या नावाचा उल्लेख केला जात होता.

विवादांपासून दूर राहण्यासाठी गांगुलीचा निर्णय
युनायटेड किंगडममधील सट्टेबाजी कंपनीतील गुंतवणुकीसह सीव्हीसी कॅपिटल्सच्या क्रीडा संपत्तीची बीसीसीआयने सखोल चौकशी न केल्याने आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना धक्का बसला. गांगुली म्हणतात, “मला आश्चर्य वाटतं की बीसीसीआयने त्यांचं काम नाही केलं आणि बोली लावणाऱ्यांपैकी एक सट्टेबाजी कंपनीचा मालक आहे की नाही हे तपासले नाही.”

ललित मोदी यांचे आरोप
ललित मोदींनी ट्विट केलंय की, “मला वाटते की सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्या आयपीएल संघ खरेदी करू शकतात, त्यामुळे नवा नियम असावा. साहजिकच एक योग्य बोली लावणारा देखील मोठ्या बेटिंग कंपनीचा मालक असतो. पुढे काय? बीसीसीआय आपलं कान करत नाही का? अशा वेळी विरोधक काय करू शकतो – भ्रष्टाचार करू शकतो?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *