महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । आगामी धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. मल्टी कॉमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याची किंमतीत 09 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सोन्याचा दर हा 47,971 रुपये आहे.
चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 262 रुपयांनी घसरण झाली आहे. 0.40 टक्के घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 64,903 रुपये नोंद झाली आहे.
दरम्यान, ऑक्टोबर 2020 नुसार गेल्या वर्षावर नजर टाकली तर सध्या तरी सोने 4 हजार रुपयांपर्यंत स्वस्त आहे. गेल्या वर्षी या दिवशी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,220 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,971 रुपये आहे.