दिवाळीत पावसाची शक्यता, राज्यात या ठिकाणी पडणार पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । Rain in Maharashtra : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. 2 नोव्हेंबरनंतर चार ते पाच दिवस पावसाळी स्थिती असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Chance of rain in Diwali)

दक्षिण आणि पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा पट्टी निर्माण झाला तर 2 ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता कमी आहे. तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पाऊस 6 ते 11 नोव्हेंबरदरम्यान पडले, अशी शक्यता आहे.

तर बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनरपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस सक्रिय असेल मात्र, महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील किमान तापमान सरासरीप्रमाणे आहे. विदर्भात अमरावती, ब्रह्मपुरी गोंदिया भागात किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने तेथे रात्रीचा गारवा जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *