T20 World Cup: आसिफ अलीनं दुबईत पाडला सिक्सचा पाऊस,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर । पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं 5 विकेट्सनं विजय मिळवला. पाकिस्तानचा आक्रमक बॅटर आसिफ अली (Asif Ali) या मॅचचा हिरो ठरला. शेवटच्या 12 बॉलमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 24 रनची आवश्यकता होती. त्यावेळी करिम जनतच्या एकाच ओव्हरमध्ये त्यानं 4 सिक्स लगावत पाकिस्तानला 19 ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला.

आसिफनं पहिल्या बॉलवर लाँग ऑफच्या वरुन सिक्स लगावला. त्यानंतर पुढच्या बॉलवर कोणताही रन निघाला नाही. अफगाणिस्तान मॅचमध्ये आहे, असं त्यावेळी वाटत होतं. पण, आसिफच्या मनात काही वेगळंच होतं. त्यानं तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा डीप मिड-विकेटवरुन सिक्स लगावला. करीमनं चौथा बॉल यॉर्कर टाकला त्यावर कोणताही रन निघाला नाही. पण ओव्हरच्या शेवटच्या दोन बॉलवर त्यानं दोन सिक्स लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

आसिफ अलीनं या स्पर्धेत सलग दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे. त्यानं न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 1 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 27 रन काढले होते. त्यानं या स्पर्धेतील 2 इनिंगमध्ये 19 बॉलवर 7 सिक्स लगावले आहेत. त्याच्या या फटकेबाजीची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होत आहे.

इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) यानंही या खेळाची प्रशंसा केली आहे. आसिफ अली नाव लक्षात ठेवा, असं ट्विट त्यानं केलंय. त्यानंतर पुढच्याच ट्विटमध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात फायनल मॅच होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड या स्पर्धेतील अपराजित टीम आहेत. पाकिस्ताननं तीन तर इंग्लंडनं दोन मॅच जिंकल्या आहेत. त्यांच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर स्टोक्सनं हे भविष्य व्यक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *