Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, भर रस्त्यात केमिकलच्या टँकरला भीषण आग - Maharashtra 24

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, भर रस्त्यात केमिकलच्या टँकरला भीषण आग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । चिपळूण तालुक्यात कामथे घाटात केमिकलच्या टँकरला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. कामथे धरण परिसरात ही आग लागली असून यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सध्या लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यात वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या जागीच थांबल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जात असलेल्या केमिकल टँकरने पेट घेतला. अचानक आग लागून आगीचे लोळ परिसरात दिसत आहेत. काळ्या धुराच्या लोळाने परिसरात प्रवाशांमध्येही भीती आहे. अधिक माहितीनुसार, अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *