उत्सवी हंगामात विक्रमी स्मार्टफोन विक्री होण्याचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । चालू वर्षातील फेस्टिव्हल सीजन(सणासुदीचा कालावधी)मध्ये स्मार्टफोन विक्रीची उलाढाल 58,400 कोटी रुपयाची होऊ शकण्याचा अंदाज आहे. 2017 च्या कालावधीत फेस्टिव्हल सीजनमध्ये 27,00 कोटी रुपयाचे स्मार्टफोन्स विक्री झाले होते. परंतु मागील पाच वर्षांच्या कालावधीत हा आकडा वधारत जात 111 टक्के अधिक राहिला आहे. साधारणपणे कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मागील वर्षात सणासुदीच्या काळात यात काहीसा खंड पडल्याची नोंद केली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून सणासुदीचा कालावधी सुरु झाला असून साधारणपणे या सीजनमध्ये जवळपास 58,400 कोटी रुपयाचे स्मार्टफोन विकले जाणार असल्याचा अंदाज मार्केट रिसर्च फर्म काउंटरपाँईटने व्यक्त केला आहे. चालू वर्षातील फेस्टिव्हल सीजनमध्ये स्मार्टफोनच्या दरम्यान विक्रीत किमती या मागील वर्षाच्या तुलनेत 14टक्के अधिक राहणार असल्याचे काउंटरपाँईटचे संशोधक संचालक तरुण पाठक यांनी सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *