महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ नोव्हेबर । पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी (ता.३१) दिवसांत कोरोनाचे झिरो (शून्य) मृत्यू झाले आहेत. दिवसांत फक्त जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात कोरोनाने दोन मृत्यू झाले आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यात दिवसभरात २६८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७१ रुग्णांचा समावेश आहे.
याउलट जिल्ह्यात दिवसांत ३६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांत शहरातील ७१ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ५३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १२६, नगरपालिका हद्दीत १७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १ नवीन कोरोना आढळून आला आहे.दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्वाधिक १७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे शहरातील ७९, पिंपरी चिंचवडमधील ८८, नगरपालिका हद्दीतील २० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एक असे एकूण ३६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.