महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । T20 वर्ल्डकप 2021 मधील दुसर्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 110 धावा केल्या, जे लक्ष्य किवी टीमने अगदी सहजरित्या पूर्ण केलं. त्यापूर्वी, कोहली टॉसही हरला. मात्र, टॉसच्या दरम्यान कोहली असं काही म्हणाला की स्वतःच्याच वाक्यात तो फसला. कोहली म्हणाला, दोन सामन्यांमधील एका आठवड्याचं अंतर ‘हास्यास्पद’ आहे.
भारताने या स्पर्धेतील पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि त्यानंतर एक आठवड्यानंतर दुसरा सामना 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला. कोहली टॉसदरम्यान म्हणाला की, हे हास्यास्पद आहे, आम्ही 10 दिवसांत दुसऱ्यांदा खेळत आहोत. हा एक लांब ब्रेक होत असल्याचं कोहलीचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर भारतीय कर्णधाराने सांगितलं होतं की, “ब्रेक टीमसाठी चांगला असतो कारण खेळाडू आयपीएलमध्ये खेळून आले आहेत. सर्व दृष्टीकोनातून ते आमच्यासाठी चांगलं होईल असं मला वाटतं. शिवाय आमच्यासाठी हे मोठे ब्रेक अशा मोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या शारीरिक स्थितीत खेळण्यासाठी म्हणून नक्कीच मदत करतील.”
मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आठवडाभरातच त्याचं मत बदललं. लांब ब्रेकमुळे त्याच्या खेळाडूंना किरकोळ दुखापतीतून सावरण्यास मदत झाली असल्याचंही कोहली म्हणालाय.
मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आठवडाभरातच त्याचे मत बदलले. त्याने कबूल केले की लांब ब्रेकमुळे त्याच्या खेळाडूंना किरकोळ दुखापतीतून सावरण्यास मदत झाली. कोहली म्हणाला की त्याने चांगले प्रशिक्षण घेतले आहे आणि मैदानावर खेळण्यासाठी उत्सुक आहे ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळते तेव्हा तुम्हाला मैदानावर चांगली कामगिरी करायची असते.