![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । नाशिकः आज वसुबारस. दिवाळीचा पहिला दिवस. त्यानिमित्त नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये नोंदवले गेले.
दिवाळी असो की दसरा. अनेकांना फक्त सोने खरेदीसाठी निमित्त लागते. नाशिकच्या सराफा बाजारात 1 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. मात्र, आता या दरात किरकोळ चढ-उतार होताना दिसत आहे. सराफा बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49850 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 68000 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46300 रुपये नोंदवले गेले. चांदी किलोमागे 67500 रुपये नोंदवली गेली. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48400 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये, तर चांदी किलोमागे 67500 रुपये नोंदवली गेली. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले. रविवारीही हेच दर होते. सराफा बाजारात वसुबारसच्या दिवशी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये नोंदवले, तर चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले.