![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । आजपासून नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. एक तारखेपासूनच अनेक महत्वाचे बदल होत आहेत. त्यामुळे पूर्ण महिन्यात तुमचे काम मार्गी लावण्यासाठी आधीच नियोजन करून ठेवा. या महिन्यातच दिवाळी, भाऊबीज असे अनेक सण येतात. त्यामुळे काही दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेला सुट्टी कधी आहे आणि कोणत्या दिवशी तुम्ही बँकेत जाऊन तुमचे काम पूर्ण करू शकाल, हे जाणून घ्या.
जर तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर अगोदर ही यादी तपासा, यामुळे तुम्हाला बँकेच्या सुट्टीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांतील बँकांना कधी सुट्ट्या आहेत, तेदेखील पाहू शकता.
सण-उत्सवामुळे महाराष्ट्रातील बँकांना 2 दिवस सुट्ट्या
४ नोव्हेंबर – दिवाळी अमावस्या / काली पूजा (बंगळुरू वगळता सर्व शहरांतील बँका बंद राहतील)
५ नोव्हेंबर – दिवाळी / नवीन वर्ष / गोवर्धन पूजा (अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद राहतील)
