दिवाळीपूर्वी बंपर कमाईची संधी; गुंतवणुकीसाठी आज खुले झाले या चार कंपन्यांचे IPO

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । मुंबई : दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना बंपर कमाई करण्याची उत्तम संधी आहे. कारण ४ कंपन्यांचे आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहेत. यामध्ये ऑनलाइन इन्शुरन्स अॅग्रीगेटर पॉलिसीबाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेक लिमिटेड (PB Fintech Ltd), सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेड, एसजेएस एंटरप्रायझेस (SJS Enterprises Limited) आणि सिगाची इंडस्ट्रीज (Sigachi Industries) यांचा समावेश आहे. हे आयपीओ (IPO) ३ नोव्हेंबरला बंद होतील.

पॉलिसी बाजार आणि पैसा बाजारचे ऑपरेटर पीबी फिनटेक लिमिटेडचा ५,७०० कोटी रुपयांचा आयपीओ आज उघडत आहे. यामध्ये ३,७५० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर १,९६० कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील. यासाठी प्राइस बँड ९४०-९८० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. किमान १५ इक्विटी शेअर्सची बोली लावता येईल. इश्यूचा १० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आहे.

पॉलिसी बाजारने आयपीओच्या आधी १५५ अँकर गुंतवणूकदारांकडून २,५६९ कोटी रुपये जमा केले आहेत. कंपनीला अँकर स्लॉटमध्ये जवळपास ४० पट बोली मिळाली. यामध्ये एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, बजाज अलियान्झ लाइफ, एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि मॅक्स लाईफ इन्शुरन्ससारख्या सुप्रसिद्ध विमा कंपन्यांचा समावेश होता. याशिवाय फिडेलिटी, बेली गिफर्ड, ड्रॅगोनियर ग्रुप, ब्लॅकरॉक आदी कंपन्यांनीही यामध्ये सहभाग घेतला. पीबी फिनटेक (PB Fintech)चे विद्यमान गुंतवणूकदार स्टीडव्हिव कॅपिटल (Steadview Capital), टायगर ग्लोबल (Tiger Global) आणि फाल्कन एज (Falcon Edge) यांनी अँकर गुंतवणुकीद्वारे कंपनीतील त्यांची गुंतवणूक दुप्पट केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *