रोहित, रिषभऐवजी ‘या’ क्रिकेटपटूच्या गळ्यात पडू शकते कर्णधारपदाची माळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ नोव्हेबर । T20 विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानी क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिली आहे. संघाने दोन सामने खेळले असून दोन्ही सामने टीम इंडियाने गमावले आहेत. पारंपरीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून तर विराट कोहलीच्या संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. या स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यादरम्यान हा संघ तीन T20 खेळणार आहे. या सामन्यांसाठी रोहित शर्माऐवजी दुसऱ्या क्रिकेटपटूला कर्णधारपदाची संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

लागोपाठ सामने खेळत असल्याने बीसीसीआयने वरिष्ठ क्रिकेटपटूंना आराम करण्याची संधी दिली आहे. यामुळे वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत केएल राहुल याच्याकडे T20 सामन्यांसाठीचे कर्णधारपद येण्याची शक्यता आहे. ANI या वृत्तसंस्थेमे बीसीसीआयमधील सूत्रांच्या आधारे याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल ही कर्णधारपदासाठीची आपली पहिली पसंती असल्याचे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितल्याचे ANI ने म्हटले आहे. न्यूझीलंडचा हिंदुस्थान दौरा 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 13,19 आणि 21 नोव्हेंबरला T20 सामने खेळवण्यात येणार आहेत. जयपूर, रांची आणि कोलकाता इथे हे सामने खेळवण्यात येणार आहेत. 25 नोव्हेंबरपासून कानपूर इथे पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. 3 ते 7 डिसेंबरदरम्यान मुंबईमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *