कामगार एन्व्हारयमेंट रन २०२० मँरेथाँनचे आयोजन ; डॉ भारती चव्हाण

Spread the love

महाराष्ट्र 24 ; पिंपरी चिंचवड (6 मार्च 2020)- सर्व कामगार बांधवांना कळविण्यात येते की रविवार दिनांक १५ मार्च २०२० रोजी सकाळी ७ वाजता मदनलाल धिंग्रा स्टेडियम, निगडी प्राधिकरण येथे ‘कामगार एन्व्हारयमेंट रन २०२० मँरेथाँनचे आयोजन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
जागतिक विषय असलेल्या पर्यावरण बचाव जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या कामगार एनव्हायरमेंट रन २०२० मध्ये सर्वांसाठी प्रवेश आहे. मुली,महिला व जेष्ठ नागरिक यांसाठी वेगळा ग्रुप करण्यात आला आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रत्येकी एक टिशर्ट व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक गटातून पहिल्या सहा विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करणार आहोत.
‘ सहप्रायोजक पी सी एम सी अँथलेटिक्स असोशिएशन,
मानिनी फौंडेशन ,प्रकल्प १०० डिवाईन एच आर फौंडेशन ,विशेष पोलिस मित्र संघटना,पिंपरी चिंचवड डाँक्टर्स असोशिएशन,स्व.शंकर अण्णा गावडे प्रतिष्ठाण,ब्लँक क्रोब्रा कमांडो,राजमुद्रा गृप,अनुप मोरे सोशल फौंडेशन ,दूर्गेश्वर मित्र मंडळ व सुनिल दूर्गे प्रतिष्ठाण इ.आहे..
आपण सर्व कामगार बांधवांनी या मँरेथाँन मध्ये सहभागी व्हावयाचे आहे व पर्यावरण जनजागृतीच्या या मोहीमेत आपला खारीचा वाटा नोंद करण्यासाठी आवश्य उपस्थित राहयाचे आहे.अधिक माहिती करिता व नावनोंदणीसाठी आपण पिंपरी चिंचवड शहरातील कुठल्याही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात नावनोंदणी करुन माहीती घ्यावी.व सहभाग घ्यावा ही विनंती….
*अधिक माहीतीसाठी संपर्कः*
kamgarenvironmentrun@gmail.com….
*तसेच नाव नोंदणी साठी*
http://www.kamgarenvironment.run/english.html..
येथे संपर्क करावा..
धन्यवाद!!!!
डॉ भारती चव्हाण
अध्यक्षा
गुणवंत कामगार कल्याण मंडळ
मा.सदस्या.महा.कामगार कल्याण मंडळ
मा.सदस्या केंद्रीय कामगार कल्याण मंडळ नवी दिल्ली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *