महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर । प्राप्तीकर विभागाकडून करदात्यांना परतावा देण्याचे काम वेगाने सुरु आहे. यामध्ये प्राप्तीकरच्या माहितीनुसार 1 एप्रिल 2021 ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत जवळपास 91.30 लाख करदात्यांना 1,12,489 कोटी रुपयाचा परतावा दिलेला आहे. यामध्ये 33,548 कोटी रुपयाचा परतावा हा व्यक्तिगत दिला असून यात 89.54 लाख करदात्यांचा समावेश राहिला आहे. दुसरीकडे 1.76 लाख करदात्यांना 78,942 कोटी रुपयाचा कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आल्याची माहिती आहे.
ई-फायलिंग पर्यायाअंतर्गत प्राप्तीकर परतावा हा पर्याय निवडून पुन्हा व्यू फाइल्ड रिटर्न्सच्या पर्यायांवर क्लिक करता येणार आहे. याच्यानंतर फाईल करण्यात आलेल्या आयटीआर पडताळून पाहता येणार आहे.
करदात्यांचे बँक खात्यामध्ये प्राप्तीकर परतावा येणार आहे. त्या बँक खात्याची सत्यता पडताळावी लागणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाकडून देण्यात आली आहे.
जर प्राप्तीकर परताव्याचा क्लेम करावयाचा असल्यास आयटीआर सादर करणे आवश्यक आहे. जेव्हा आयटीआर दाखल केले जाते. तेव्हा प्राप्तीकर विभागाकडून असेसमेंट करावे लागणार आहे.प्राप्तीकर विभागाकडून जर ईमेल करदात्यांना आल्यास सदच्या ईमेलला उत्तर द्यावे लागणार असल्याचे सीए अभय शर्मा यांनी यावेळी दिले आहे.