महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर । सध्या क्रिकेट जगतात टी-20 वर्ल्ड कपचे (T20 WorldCup) वारे वाहू लागले आहेत. सुपर 12 चे सामने आता शेवटच्या फेरीत पोहोचले आहेत. दरम्यान, अनेक दिग्गज आपापल्या दृष्टिकोनातून यंदाचा टी-20 वर्ल्ड कप कोण जिंकणार याची भविष्यवाणी करत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेदेखील (Virender Sehwag) भविष्यावाणी केली आहे.
सराव सामन्यांच्या विजयामुळे क्रिकेट जगतात टी-20 वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला संघ म्हणचे टीम इंडिया असे सांगितले जात होते. मात्र, आता हे चित्र पालटले असून सर्वांच्या नजरा विजयाची घोडदौड कायम ठेवलेल्या पाकिस्तान संघ आणि इंग्लंडच्या संघाकडे वळल्या आहेत.
Veerugiri.com या फेसबुक पेजवरील आपल्या खास कार्यक्रमात सेहवागने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना टी-20 वर्ल्ड कपबाबतचे भाकीत सांगितले. तो म्हणाला, ‘मला एका बाजूने पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूने कदाचित इंग्लंड. हे दोन्ही संघ अंतिम फेरीत खेळतील. आणि कदाचित इंग्लंड संघ हा टी-20 वर्ल्ड जिंकेल. असे मत सेहवागने यावेळी व्यक्त केले.
सेहवागचे म्हणणे खरे ठरू शकते. इंग्लंडचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत त्यांचा संघ कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 12 मधील सर्व सामने इंग्लंडने जिंकले आहेत. दुसरीकडे पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानच्या संघानेही आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत.