महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ नोव्हेबर । उत्सवी काळात लोकांनी मोठय़ा प्रमाणात खर्च केल्याचे दिसले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात 10.90 लाख पेडिट कार्ड वितरीत करण्यात आली आहेत. महिन्याच्या आधारे पाहता मागणी जवळपास 110 टक्के इतकी वाढली आहे. एचडीएफसी बँकेने 2.44 लाख क्रेडिट कार्डची मागणी पूर्ण केली आहे. आयसीआयसीआय बँकेने पाठोपाठ 2.23 लाख तर ऍक्सिस बँकेने 2.02 लाख क्रेडिट कार्डे वितरीत केली आहेत.