या इलेक्ट्रिक बाइक्सच्या विक्रीत ५०० टक्क्यांची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स (AMO electric bikes) या भारतातील विश्वसनीय, स्थिर व किफायतशीर ई-मोबिलिटी सोल्युशन्सची निर्मिती करणा-या ब्रॅण्डने ऑक्टोबर २०२१ मध्ये ५०० टक्क्यांहून अधिक वाढीची नोंद केली आहे. कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातील ४१६ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये २५०० युनिट्सची विक्री केली आहे.

धनत्रयोदशी व दिवाळीमध्ये बाईक्सच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली दरम्यान विक्रीच्या संदर्भात कर्मचा-यांना उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहित करण्याच्या नेतृत्वाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार म्हणाले, “सणासुदीच्या काळामध्ये हा टप्पा आनंददायी संकेत आहे. यंदाच्या वर्षातील तिस-या तिमाहीमध्ये देखील सातत्याने विकास होताना दिसत आहे. ऑगस्टमध्ये २०० टक्के, सप्टेंबरमध्ये ३०० टक्के आणि ऑक्टोबरमध्ये ५०० टक्के वाढ दिसून आली. भविष्यात आमचा मासिक ६००० युनिट्सची विक्री करण्याचा मनसुबा आहे. आम्ही भारतातील इलेक्ट्रिक मो‍बिलिटी विभागामध्ये मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत असून पुढील ३ वर्षांमध्ये २०० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्याचा आमचा मनसुबा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *