अजून ‘भाव’ खाणार, बासमती तांदूळ ; पावसामुळे नुकसानीचा परिणाम दरावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम केवळ मराठवाड्यातील (Marathwada) खरीप पिकांवरच नाही तर परराज्यातील भात शेतीवरही झाला आहे. ( rain results) पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता याचा परिणाम तांदळाच्या दरावर होणार आहे. उत्पादनात 20 टक्केपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे तर काही दिवसांमध्येच बासमती ( Rice prices to rise) तांदळाचे दर हे प्रति क्विंटलमागे 2000 हजाराने वाढतील असा अंदाज आहे. त्यामुळे बासमती तांदूळ हा सर्वसामान्यांच्या ताटातून हद्दपार होणार असल्याचे चित्र आहे.

सध्या बासमती तांदळाचे दर हे 8500 रुपये क्विंटल आहेत तर दुसरीकडे किरकोळ बाजारात ग्राहकांना 70 ते 90 रुपये किलो मिळत आहेत. बासमती तांदूळ भारतातून 150 देशांमध्ये निर्यात केला जातो. देशातील पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये बासमतीची लागवड केली जाते. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, सहारनपूर, आग्रा, अलिगड, मुरादाबाद, बरेली या सर्व जिल्ह्यांमध्ये बासमती तांदूळ तयार होतो. येथे माती आणि हवामान बासमती तांदळासाठीदेखील योग्य आहे. सिंचनाची संसाधनेही जास्त आहेत. बासमती जगभरातील अन्न आणि रेस्टॉरंट उद्योगात प्रीमियम तांदूळ म्हणून आपली उपस्थिती कायम ठेवत आहे कारण त्याची अनोखी चव आणि गुणधर्म आहेत.

बासमतीसाठी 7 राज्यातील 95 जिल्ह्यांना भौगोलिक मानांकन
देशात बासमती तांदळाच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळेच भारतातून तब्बल 150 देशांमध्ये तांदळाची निर्यात केली जाते. देशातील 7 राज्यातील 95 जिल्ह्यांना याकरिता भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशातील ३० जिल्हे आणि जम्मू-काश्मीरच्या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. हिमालयाच्या पायथ्याशी, गंगेच्या मैदानी भागात बासमती तांदूळ तयार होतो. यात पाकिस्तानचा भाग असलेल्या पंजाबच्या 14 जिल्ह्यांचा समावेश आहे.

यामुळे वाढणार बासमती तांदळाच्या किमती
ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बासमती भात शेतीचे नुकसान झाले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात 4 लाख 50 हजार हेक्टर जमिनीवर 16 लाख टन बासमतीचे उत्पादन होते. यात 10 लाख टन बासमती तांदूळ तयार होतो. गंगेच्या बाजूने पाऊस आणि पुरामुळे 20-25 टक्के भाताचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत बासमती तांदळाचे दर 11000 क्विंटलपर्यंत पोहोचू शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम निर्यातीवरही होईल. यावेळी पावसाने तांदळाचा दर्जा गमावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *