ओबिसी प्रबोधन शिबीराचे गुरुवारी पिंपरीत आयोजन ; डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे आणि प्रा. हरी नरके करणार मार्गदर्शन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 11 नोव्हेंबर) पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृह येथे ओबीसी प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती समता परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

सकाळी नऊ वाजता या शिबीराचे उद्‌घाटन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ आणि समता परिषदेच्या महिला प्रदेश अध्यक्षा मंजिरी धाडगेयांच्या हस्ते होणार आहे. तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे आणि प्रा. हरि नरके हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.या शिबिराच्या निमित्ताने डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे आणि हरी नरके हे तीन ज्येष्ठ विचारवंत पहिल्यांदाच एका व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिराची नियोजन बैठक सोमवारी पिंपरीतील महात्मा फुले स्मारक येथे झाली. यावेळी कुंभार समाजाचे प्रदेश अध्यक्ष व माजी नगरसेवक सतीश दरेकर, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, पी. के. महाजन, वंदना जाधव, ॲड. पराग भुजबळ, मच्छिन्द्र दरवडे, मनोहर कानडे, ईश्वर कुदळे, पुंडलिक सैंदाणे, शंकर लोंढे, विशाल जाधव, ॲड. विद्या शिंदे, रमेश सोनावणे तसेच महेश भागवत आदी उपस्थित होते.

या शिबिराच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी चळवळीला आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी योग्य दिशा देण्याचे काम केले जाणार आहे त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजातील संघटनांच्या प्रतिनिधींनी, आजी, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असेही आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहर
अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ यांनी केले आहे.
………………………..
अधिक माहितीसाठी संपर्क : ॲड. चंद्रशेखर भुजबळ
95034 80428.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *