IPL मुळे भारताचं नुकसान पण…कर्णधार म्हणतो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला नाही. यामुळे कुठेतरी आयपीएलवर आरोप करण्यात येतोय. या मुद्द्यावरून अनेक खेळांडूंवरही टीका केली जातेय. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने वर्ल्डकपपूर्वी आयपीएल खेळणं हे आमच्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.टी-20 वर्ल्डकप न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला की, वर्ल्डपमध्ये आयपीएल खेळणं आणि इतर फ्रँचायझी क्रिकेट खेळणं खूप फायद्याचे होतं. या खेळामुळे अनेक गोष्टी सोप्या होण्यास मदत झाली आहे.

केन विल्यमसन म्हणाला की, आयपीएलचा दुसरा टप्पा बदलांनी भरलेला होता. यूएईमध्ये वेगळ्या खेळपट्टीवर खेळ करणं खूप फायदेशीर होतं. हे क्रिकेट आहे त्यामुळे या स्पर्धेत कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो.यावेळी टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचता आलेलं नाही. तेव्हापासून आयपीएलबाबत गदारोळ सुरू आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनीही भारतीय संघातील काही खेळाडू आयपीएलला जास्त महत्त्व देतात, असं विधान केलं होतं.

इतकेच नाही तर रवी शास्त्री असंही म्हणाले होते की, जर आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये काही अंतर असते तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू T20 वर्ल्डकपपूर्वी IPL चा भाग होते आणि सर्व UAE मध्ये होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *