T20 World Cup: ऑस्ट्रेलियानं 11 वर्षां पूर्वीची जखम केली ताजी, पाकिस्तानचं विजेतेपदाचं स्वप्न भंग पावलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । ऑस्ट्रेलियानं गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये (Australia vs Pakistan Semi Final) पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सुपर 12 मध्ये सर्व मॅच जिंकणाऱ्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवता आला नाही. या पराभवाबरोबरच पाकिस्तानचं विजेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. आता रविवारी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची लढत न्यूझीलंडशी (Australia vs New Zealand T20 World Cup 2021 Final) होणार आहे.

वेडनं केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानची 11 वर्षांपूर्वीची जखम ताजी झाली आहे. 2010 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्येही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन टीम आमने-सामने होत्या. त्या मॅचमध्ये पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटींग करत ऑस्ट्रेलियासमोर 192 रनचं टार्गेट ठेवलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करता ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. 18 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 आऊट 144 झाली होती.

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 34 रन हवे होते. मोहम्मद आमिरनं टाकलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये 16 रन निघाले. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रनची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाचा बॅटर माईक हसीला त्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर स्ट्राईक मिळाली. त्यानं पहिल्या दोन बॉलवर सिक्स तर नंतर एक फोर लगावला. त्यानंतर पाचव्या बॉलवर पुन्हा सिक्स लगावत ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं. हसीनं त्या मॅचमध्ये फक्त 24 बॉलमध्ये 250 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 60 रन काढले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *