महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । जिद्द आणि कामाप्रती असलेली निष्ठा व्यक्तीला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते. असंच घडलंय पाकिस्तानचा विकेटकिपर बॅट्समन मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan)बाबत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्य सामन्याआधी दोन दिवस रिझवान रुग्णालयात ICU मध्ये होते. तिसऱ्या दिवशी जेव्हा देशाला त्याची गरज होती तेव्हा तो मैदानावर हजर होता. जेसे काही झालेच नव्हते. (Pak vs Aus)
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात आपल्या फुफुसांच्या इंफेक्शनला रिझवान विसरला होता. त्याच्या तब्बेतीत काहीशी सुधारणा झाली होती. परंतु जेवढी झाली तेवढी त्याने टीमसाठी पूरेशी असल्याचे समजले. ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपल्या टीमची ढाल बनून तो उभा राहिला.
विशेष म्हणजे रिझवान रुग्णालयातून थेट मैदानात फक्त सामना खेळण्यास उतरला नाही तर, टॉप स्कोअरर देखील ठरला. त्याने अनफिट असूनही 87 मिनिटे फलंदाजी केली. दरम्यान 52 चेंडूत 67 धावा केल्या. रिझवानने या सामन्यात 3 चौकार आणि 4 षटकार लगावले.
https://www.instagram.com/imshoaibakhtar/?utm_source=ig_embed&ig_rid=d6911301-eee7-4128-a8b3-701f7d03d1c0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तानचा पराभव झाला परंतु, आपल्या या खेळीने रिझवानने क्रिकेट जगताचे मन जिंकले. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सोशल मीडियाच्या माध्यमातून रिझवान कौतुक केले. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात रिझवानच्या 4 षटकारांसह टी 20 वर्ल्डकपमधील सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला. वेस्ट इंडिजचा फलंदाज एविन लुईस आणि मोहम्मद रिझवानच्या नावावर सर्वाधिक म्हणजेच 37 षटकारांची नोंद आहे.