T20 World Cup Final: फायनलपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, महत्त्वाचा खेळाडू आऊट ; रविवारी दुबईत मिळणार नवा चॅम्पियन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात आता टी20 वर्ल्ड कपची फायनल (T20 World Cup 2021 Final) मॅच होणार आहे. ऑस्ट्रेलियानं गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव केला. तर पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं इंग्लंडला पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाची टीम 11 वर्षांनी तर न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेली आहे.

न्यूझीलंडला त्यांच्या टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मॅचपूर्वी धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा विकेट किपर बॅटर डेवॉन कॉनवे (Devon Conway) फायनलमधून आऊट झाला आहे. कॉनवेच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये त्याला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो फायनल मॅचसह त्यानंतर होणाऱ्या भारत दौऱ्यातूनही आऊट झाला आहे.

Devon Conway has been ruled out of the @T20WorldCup Final and following tour to India with a broken right hand. Conway sustained the injury when he struck his bat immediately after being dismissed in last night’s semi-final. More Info | https://t.co/LCMOTJqmqc #T20WorldCup pic.twitter.com/JIm9o6Rhxe

— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 11, 2021

कॉनवेनं इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये 38 बॉलमध्ये 46 रन काढले होते.इंग्लंडने दिलेल्या 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी टीमची अवस्था बिकट झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी कॉनवेनं डॅरेल मिचेल (Darell Mitchell) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 82 रनची भागिदारी करत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला होता. यावर्षी फॉर्मात असलेल्या कॉनवेला दुखापत झाल्यानं न्यूझीलंडला धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध (Australia vs New Zealand Final) होणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम यापूर्वी 2010 साली फायनलमध्ये पोहचली होती. पण, त्यावेळी इंग्लंडनं त्यांना पराभूत केले होते. तर, न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे रविवारी दुबईत होणाऱ्या मॅचमध्ये कोणतीही टीम जिंकली तरी नवा चॅम्पियन मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *