Petrol-Diesel Price Today: उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल शतकापार , डिझेलही नव्वदीपार !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी (Petrol Diesel Price Today) केले आहेत. आज देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. मात्र आज इंधनाचे दर (Fuel Price Today) कमी देखील झालेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असणारे दर सामान्यांसाठी न परवडणारेच आहे. या आठवड्यात रविवारपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे.

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे.

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Rate Today)

@ दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

@ मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

@ चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

@ कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

@ श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर

@ पोर्ट ब्लेयर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *