महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । मोफत मिळणारी प्रत्येक वस्तू घेण्याचा मोह सर्वांनाच असतो. अनेकदा युजर्सच्या स्मार्टफोनवर एखाद्या वस्तूच्या फ्री ऑफरसंदर्भात मेसेज आला की त्याची चर्चा होते. मोफत मिळतंय तर आपला तोटा काय हा विचार करून अनेकजण मेसेजेसवरील लिंकला क्लिक पुढे अडचणीत सापडतात. ‘केंद्र सरकारकडून लोकांना फ्री लॅपटॉप मिळणार’ असा काहीसा मेसेज सध्या व्हायरल (Fraud alert messages on WhatsApp) होत आहे.
हा मेसेज तुम्हालाही आला असेल तर या व्हायरल मेसेजपासून वेळीच सावध (fraud message for Free laptop) होण्याची गरज आहे. हे काय नेमकं प्रकरण आहे आणि यापासून कसा बचाव करायला हवा याबाबत आपण माहिती जाणून घेऊयात.
WhatsApp वर लोकांना पंतप्रधान लॅपटॉप वितरण योजनेअंतर्गत मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे मेसेज लोकांना येत आहेत. त्याचबरोबर (how to identify a fake text message) या योजनेचा लाभ घेण्यासाठी मेसेजखाली फेक लिंकही देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण या लिंकवर क्लिक करुन अडचणीत येऊ शकतात.
केंद्र सरकारकडून लॅपटॉप फ्री देण्याची अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही. लोकांचा स्मार्टफोन हॅक करून त्यातील डेटा आणि प्रायव्हेट माहिती गोळा करण्याच्या उद्देश्याने काही फ्रॉड करणाऱ्यांनी हे फेक मेसेज लोकांना पाठवायला सुरूवात केलेली आहे. यासंदर्भात आता PIBFactCheck ने ही एक मेसेज जारी करून लोकांना याबाबत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
त्याचबरोबर अशा कोणत्याही मेसेजला त्यावरील लिंकला बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे फेक मेसेजेस फॉरवर्ड न करण्याचा इशाराही PIBFactCheck ने दिला आहे. कारण त्यामुळं युजर्सच्या डेटाचोरीची आणि आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.