T20 WC Final : न्‍यूझीलंड की ऑस्‍ट्रेलिया कोण जिंकणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । टी २० वर्ल्डकपवर आपले नाव कोरण्‍यासाठी उद्‍या(दि. १४) न्‍यूझीलंड आणि ऑस्‍ट्रेलियाचा संघ मैदानात उतरणार आहेत. दोन्‍ही संघांनी सेमिफायनलमध्‍ये प्रतिस्‍पर्धींविरोधात दमदार कामगिरी करत फायनलमध्‍ये धडक मारली आहे. आता फायनलमध्‍ये ( T20 WC Final ) कोण बाजी मारणार? याकडे दोन्‍ही देशांबरोबर भारतातील क्रिकेटप्रेमींचेही लक्ष वेधले आहे. या दोन संघांपैकी टी २० मधील नवा विश्‍वविजेता ठरणार ?याबाबत ऑस्‍ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न याने आपले मत मांडले आहे.

यंदाचा टी २० वर्ल्डकपवर अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. या स्‍पर्धेत नाणेफेक महत्त्‍वपूर्ण ठरली आहे. फायनलच्‍या सामन्‍यातही नाणेफेक महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. दुसर्‍यांदा फलंदाजी करणारा संघ विजयी होण्‍याची शक्‍यता अधिक आहे. आतापर्यंत दुबईच्‍या मैदानावर दुसर्‍यांदा फलंदाजी करणार्‍या संघाने बाजी मारली आहे.

रविवारी होणार्‍या न्‍यूझीलंड विरुद्‍ध ऑस्‍ट्रेलिया फायनल मॅच संदर्भात ऑस्‍ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्न याने आपल्‍या ट्‍विटरवरुन एक व्‍हिडिओ शेअर केला आहे. त्‍याने म्‍हटलं आहे की, यंदाच्‍या टी २० वर्ल्डकप मध्‍ये आतापर्यंत संघांनी जबरदस्‍त कामगिरी केली आहे. न्‍यूझीलंड आणि ऑस्‍ट्रेलिया या दोन्‍ही संघांनी सेमिफायनलमध्‍ये दमदार कामगिरी करत मोठ्या दिमाखात फायनलमध्‍ये स्‍थान मिळवले आहे. फायनलसाठी दोन्‍ही संघांना माझ्‍या शुभेचछा.

ऑस्‍ट्रेलियाचा संघाने सेमिफायनलमध्‍ये पाकिस्‍तानचा ज्‍या पद्‍धतीने पराभव केला आहे यावरुन यंदाच्‍या टी २० वर्ल्डकप हाच संघ जिंकेल असे वाटते. पाकिस्‍तानविरोधातील सामना ऑस्‍ट्रेलियाच्‍या खेळाडूंनी ज्‍या खेळीने संपवला यावरुन तरी ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाला सूर सापडला आहे, असे दिसते, असे शेन वॉर्न यांनी म्‍हटलं आहे. यंदाच्‍या टी २० वर्ल्डकपमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाचा स्‍टीव्‍ह स्‍मिथ याने खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. त्‍यामुळे फायनलच्‍या संघात त्‍याला स्‍थान मिळेल, असे वाटत नाही, असेही शेन वॉनने म्‍हटलं आहे.

रविवारी (दि.१४) होणार्‍या फायनल सामन्‍यात न्‍यूझीलंड आणि ऑस्‍ट्रेलिया आमनेसामने असतील. आजपर्यंत या दोन्‍ही संघांनी टी २० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दोन्‍ही संघापैकी कोणीही जिंकले तरी टी २० ला नवा विजेता मिळणार आहे. त्‍यामुळेच या सामन्‍याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *