मच्छिमारांच्या जाळ्यात सापडला अतिदुर्मीळ झिंगा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । समुद्राच्या पोटात जैवविविधतेचा खूप मोठा खजिना दडला आहे. कधी कधी क्वचित या खजिन्यातली दुर्मीळ रत्न सापडतात. अशाच प्रकारे चार ते पाच वर्षांत कधीतरी एकदाच सापडणारा दुर्मीळ जातीचा झिंगा सापडला आहे.

अमेरिकेतील मायन या संघराज्यातील एका समुद्रात मच्छिमाराच्या जाळीत तो सापडला. हलक्या निळ्या रंगाचा हा झिंगा कॉटन कँडी लॉबस्टर या नावाने ओळखला जातो. कॉटन कँडी नावाच्या एका गोड पदार्थाच्या रंगाप्रमाणे त्याचा रंग असतो.

झिंगा हा एक प्रसिद्ध असा समुद्री जिन्नस आहे. हा झिंगा अतिदुर्मीळ प्रकारात मोडतो. जवळपास दहा कोटी माशांमागे एखादाच झिंगा सापडतो. या झिंग्यांची एकूण संख्या नेमकी किती आहे, तेही आजवर कळू शकलेलं नाही.

जिवंत झिंग्याच्या आवरणावर जे प्रथिन असतं, त्यातून एस्टेक्सएंथिन नावाचा पदार्थ स्रवतो. या पदार्थावर जेव्हा प्रकाश पडतो, तेव्हा झिंग्याचे निरनिराळे रंग दिसतात. ज्या प्रकारचा प्रकाश झिंग्यावर पडतो, त्या रंगाचा तो दिसत राहतो. म्हणूनच कॉटन कँडी झिंग्याचा रंग निळा दिसतो. तर काही झिंगे नारिंगी, पिवळे किंवा लाल रंगाचे असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *