महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ नोव्हेंबर । ICC team of the tournament in the T20 World Cup 2021 ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार संपला… ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना पहिलेवहिले ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद नावावर केले. या स्पर्धेत अनेक थरारक सामने पाहायला मिळाले, तगड्या संघांना पराभवाचा धक्का बसला अन् काही नव्या संघांनी आपल्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले. ४५ सामन्यांच्या थरारानंतर आयसीसीनं स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची घोषणा सोमवारी केली. Most Valuabe Team of the Tournament has been selected.
इयान बिशॉप, नॅटाली जेर्मानोस आमइ शेन वॉटसन यांच्यासह पत्रकार लॉरेंन्स बूथ व शाहिद हाश्मी यांनी या स्पर्धेतील अव्वल १२ खेळाडू निवडून संघ जाहीर केला. मोहम्मद रिझवान याला टॉप ऑर्डरमध्ये स्थान मिळालेलं नाही. चतिथ असलंका आणि एडन मार्करामन यांनी मात्र या संघात स्थान पटकावले आहे. मोइन अलीनं अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान पटकावले. गोलंदाजीमध्ये वनिंदू हसरंगा आणि अॅडम झम्पा यांची निवड केली आहे. शाहिन शाह आफ्रिदी हा १२ वा खेळाडू म्हणून संघात असणार आहे. पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्याकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
🚨 Just in 🚨
The @upstox Most Valuable Team of the Tournament has been named 📋#T20WorldCup https://t.co/p0SuwdZgpS
— ICC (@ICC) November 15, 2021