आणखी एका जागतिक कंपनीच्या सीईओ पदी भारतीय सोनिया स्यंगल यांची नियुक्ती

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली –
जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या उच्च पदांवर भारतीयांचा दबदबा आहे. आता या यादीत सोनिया स्यंगल हे नाव जोडले गेले आहे. सोनिया स्यंगल यांची अमेरिकेतील कपड्यांचे किरकोळ विक्रेता कंपनी गॅप इंकच्या सीइओ पदी नियुक्त करण्यात आले आहे. 49 वर्षीय स्यंगल फॉर्च्युनच्या 500 जणांच्या यादीत एखाद्या कंपनीच्या एकमेव भारतीय-अमेरिका महिला सीईओ आहेत. त्यांच्या आधी या यादीत पेप्सिकोच्या सीईओ म्हणून इंदिरा नूयी यांचे नाव होते.

भारतात जन्मलेल्या सोनिया स्यंगल यांचे कुटुंब सुरूवातीपासूनच कॅनडा आणि त्यानंतर अमेरिकेत स्थायी झाले. त्यांनी 1993 मध्ये कॅटरिंग यूनिवर्सिटीमधून मॅकनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली घेतली. त्यानंतर 1995 ला स्टँडफर्ड यूनिवर्सिटीमधून मॅन्यूफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांना 20 आणि 17 वर्षांची दोन मुले आहेत. सोनिया यांनी 10 वर्ष मायक्रोसिस्टम्स आणि 6 वर्ष फोर्ड मोटरमध्ये काम केले आहे. 2004 मध्ये त्यांनी गॅपला जॉइन केले. त्यांनी कंपनीच्या ग्लोबल सप्लाय चेन आणि प्रोडक्ट टू मार्केट मॉडेलचे नेतृत्व केले होते व त्या यूरोप झोनच्या एमडी देखील होत्या. सोनिया यांच्या नियुक्तीआधी कंपनीच्या सीईओपदी गॅपच्या संस्थापकांचा मुलगा रॉबर्ट फिशर हे होते. 18 अब्ज डॉलर भांडवल असणारी ही कंपनी फॉर्च्युन 500 यादीत 186 व्या स्थानी आहे. कंपनीत 1 लाख 35 हजार कर्मचारी काम करतात. अमेरिकेसह कंपनीचे जगभरात 3,727 स्टोर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *