महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ नोव्हेंबर । देशात आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करता येणार आहे. तसा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
हत्या, आत्महत्या, बलात्कार, छिन्नविछिन्न मृतदेह आणि संशयास्पद प्रकरणे वगळता योग्य पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये आता चोवीस तास पोस्टमॉर्टम करता येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर कारणांसाठी रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या या शवविच्छेदन प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे.