महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ नोव्हेबर । मागील काही दिवसांपूर्वी काही भाज्यांच्या दराने शंभरी गाठली होती. सध्या भाज्यांची आवक वाढल्याने वसई-विरारमध्ये भाज्यांचे दरात घसरण पाहायला मिळाली. भाजीपाल्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी घसरण झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली आहे. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आणि अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते. करोना काळात कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीबरोबरच नागरिकांच्या स्वयंपाकघराचे गणितसुद्धा बिघडले होते. पण टाळेबंदीत आणलेली शिथिलता आणि थंडीच्या आगमनाबरोबर भाज्यांची आवक वाढली. मागील काही आठवडय़ांच्या तुलनेने या महिन्यात हे दर १५ ते २० टक्क्यांपर्यंत खाली आले. आगामी काळात मोठय़ा प्रमाणावर हे दर कमी होणार होण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारातील दर कमी झाले असले तरी अजूनही किरकोळ बाजारात मात्र घाऊक दराच्या तुलनेने भाज्यांच्या किमती जास्त आहेत. कारण घाऊक बाजाराच्या २० ते ३० टक्के अधिक दराने भाज्यांची विक्री किरकोळ बाजारात केली जाते. यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अजूनही काही भाज्यांचे दर आवाक्याच्या बाहेर आहेत.
आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !
😊विचारात पडलात ना ?
💶दररोजची वाढती महागाई,🏃दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,
💊न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….!
*तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा *
आणि जगा चिंतामुक्त जीवन
एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !
👉मेडिक्लेम व इन्शुरन्स👈