भारत vs न्यूझीलंड दुसरा टी-20 सामना: रांचीत टीम इंडिया मालिका विजयासाठी आज मैदानावर, प्रक्षेपण संध्याकाळी 7.30 वाजेपासून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ नोव्हेबर । सलामीच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात आलेला यजमान भारतीय क्रिकेट संघ आता सलग दुसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाची नजर आता रांचीच्या मैदानावर विजयी हॅट्रिक मालिका आपल्या नावे करण्याकडे लागली आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज शुक्रवारी मालिकेतील दुसरा टी-२० सामना हाेणार आहे. भारतीय संघाने सलामीचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. त्यामुळे हा सामना टी-२० विश्वचषकातील उपविजेत्या न्यूझीलंड टीमसाठी करा वा मरा असा आहे.

या मैदानावर टीम इंडियाचे पारडे जड मानले जाते. कारण आतापर्यंत भारताने या मैदानावर सलग दाेन टी-२० सामन्यांत विजयी पताका फडकावली. राहुल द्रविडच्या मार्गदर्शन आणि राेहितच्या नव्या नेतृत्वाखाली टीम इंंडियाने विजयाचे खाते उघडले आहे. त्यामुळे आता ही लय कायम ठेवताना नेतृत्वात मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया आज खेळणार आहे.

सलग दुसऱ्या मालिका विजयाची संधी :
भारतीय संघाला आता न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरी मालिका आपल्या नावे करण्याची माेठी संधी आहे. भारतीय संघाने गतवर्षी यजमान न्यूझीलंड टीमचा घरच्या मैदानावर पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत धुव्वा उडवला हाेता. टीम इंडियाने ही मालिका ५-० ने आपल्या नावे केली हाेती. त्यामुळे आता मालिका विजयाचा कित्ता गिरवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यजमान भारतीय संघाला आता आपल्या घरच्या मैदानावर हे यश संपादन करण्याची संधी आहे.

कर्णधार राेहित शर्माने आता नव्या जबाबदारीसह दमदार पुनरागमन केले आहे. त्याची गत सलामी सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. तसेच याचदरम्यान मुंबईचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवही चमकला. त्याने शानदार अर्धशतकासह टीम इंडियाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे आता या दाेघांकडून यजमान टीमला दुसऱ्या सामन्यातही माेठ्या खेळीची आशा आहे. गत सामन्यात माेलाची कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसह श्रेयस अय्यरची सुमार खेळी टीमसाठी चिंताजनक ठरत आहे. कारण अद्याप या दाेघांना समाधानकारक अशी खेळी करता आली नाही.

रांचीच्या जेएससीए स्टेडियमची आसन क्षमता ३९ हजार आहे. दरम्यान, दाेन वर्षांनंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना हाेत आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान हे स्टेडियम फुल्ल हाेणार आहे. सध्या या ठिकाणी माेठ्या प्रमाणात दव पडत आहे. त्यामुळे या मैदानावर नाणेफेकीचा काैलही महत्त्वाचा ठरणार आहे.

सलग दुसऱ्या मालिका विजयाची संधी :भारतीय संघाला आता न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरी मालिका आपल्या नावे करण्याची माेठी संधी आहे. भारतीय संघाने गतवर्षी यजमान न्यूझीलंड टीमचा घरच्या मैदानावर पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत धुव्वा उडवला हाेता. टीम इंडियाने ही मालिका ५-० ने आपल्या नावे केली हाेती. त्यामुळे आता मालिका विजयाचा कित्ता गिरवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यजमान भारतीय संघाला आता आपल्या घरच्या मैदानावर हे यश संपादन करण्याची संधी आहे.

कर्णधार राेहित शर्माने आता नव्या जबाबदारीसह दमदार पुनरागमन केले आहे. त्याची गत सलामी सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. तसेच याचदरम्यान मुंबईचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवही चमकला. त्याने शानदार अर्धशतकासह टीम इंडियाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे आता या दाेघांकडून यजमान टीमला दुसऱ्या सामन्यातही माेठ्या खेळीची आशा आहे. गत सामन्यात माेलाची कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसह श्रेयस अय्यरची सुमार खेळी टीमसाठी चिंताजनक ठरत आहे. कारण अद्याप या दाेघांना समाधानकारक अशी खेळी करता आली नाही.

स्टेडियम फुल; नाणेफेक महत्त्वपूर्ण :

रांचीच्या जेएससीए स्टेडियमची आसन क्षमता ३९ हजार आहे. दरम्यान, दाेन वर्षांनंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना हाेत आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान हे स्टेडियम फुल्ल हाेणार आहे. सध्या या ठिकाणी माेठ्या प्रमाणात दव पडत आहे. त्यामुळे या मैदानावर नाणेफेकीचा काैलही महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *