Vidhan Parishad Election 2021 : भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ नोव्हेबर । महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या सहा जागांमध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश असून मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) पुरेशा संख्याबळामुळे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपसाठी (BJP)सोपा पेपर असणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून उत्तर भारतीय किंवा बिहारी चेहरा उमेदवार म्हणून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सध्याचं मुंबई महापालिकेतील (BMC) नगरसेवकांचं संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवर सहज विजयी होऊ शकते. विधान परिषदेचे विद्यमान सदस्य रामदास कदम हे शिवसेनेतून तर काँग्रेस पक्षाकडून भाई जगताप यांच्या दोन जागांवर कार्यकाळ संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागांवर शिवसेना मराठी चेहरा उमेदवार देईल अशी शक्यता आहे.

भाजपात नुकतेच प्रवेश केलेले कृपाशंकरसिंग तसंच मुंबई भाजपा सरचिटणीस असलेले संजय उपाध्याय, संजय मिश्रा, संजय पांडे, राजहंस सिंग या नेत्यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत. कोअर कमिटीत देखील मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत तसंच उत्तर प्रदेशात असणाऱ्या निवडणुका लक्षात घेता विधान परिषदेची उमेदवारी देण्याकडे सर्वच नेत्यांची भूमिका होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *