महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ नोव्हेंबर । 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, 2014 साली खर्या अर्थाने हिंदुस्थान स्वातंत्र्य झाला असे वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना राणावतने केले होते. या विधानाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पाठिंबा दर्शवला होता. या भूमिकेवर आपण आजही ठाम आहोत असे गोखले म्हणाले आहेत. तसेच आपल्या सत्कारानिमित्त झालेले भाषण माध्यमांनी दाखवलेच नाही त्यामुळे गोखले यांनी माध्यमांवरही रोष व्यक्त केला आहे.
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की अभिनेत्री कंगना राणावतला मी व्यक्तीशः ओळखत नाही तिच्यासोबत कामही केले नाही. परंतु तिने केलेल्या विधानाला दिलेल्या पाठिंब्या मागे माझा राजकीय अभ्यास आहे. मी राजकीय विश्लेषक नाही परंतु मी राज्यशास्त्राचा अभ्यासक आहे. जाणकारांनी दिनांक 18 मे 2014 चा द गार्डियन हे वृत्तपत्र वाचावे. या दिवशी गार्डियनमध्ये जे छापले होते, तेच कंगणा म्हणाली असे विक्रम गोखले म्हणाले. 2014 साली आपला देश जगात मानाने उभा राहिला असे गोखले म्हणाले. पत्रकार परिषद सुरू होण्यपूर्वी आपण संदर्भहीन प्रश्नांना उत्तर देणार नाही असेही गोखले यांनी जाहीर केले होते.