आता रेशन दुकानात धान्याशिवाय चहा, कॉफी, साबण, शाम्पू आणि बरंच काही…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ नोव्हेंबर । Consumer Protection : सर्व सामान्य लोकांसाठी एक दिलासादायक बातमी. आता रेशन दुकानात (Ration Shop) चहा (Tea) कॉफी, (Coffee) साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे. राज्यातील 52 हजार दुकानदारांना या वस्तूंची विक्री करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. आतापर्यंत गहू, तांदूळ, तेल आणि साखर या गोष्टी खरेदी करता येत होत्या.

राज्यातील रेशन दुकानांतून आता खुल्या बाजारातील अंघोळ आणि धुण्याचा साबण, डिटर्जंट पावडर, शाम्पू, चहा-कॉफी विकता येईल. त्यास अन्न-नागरी पुरवठा (Food Civil Supplies) आणि ग्राहक संरक्षण विभागाने (Department of Consumer Protection) काल मान्यता दिली.

दुकानापर्यंत खुल्या बाजारातील वस्तू मिळवणे, विक्रीपोटीचे कमीशन (commission) यासाठी रेशन दुकानदारांनी वितरकांशी परस्पर संपर्क साधायचा आहे. व्यवहार संबंधित कंपनी (company), त्यांचे घाऊक आणि किरकोळ वितरक आणि रेशन दुकानदारांमध्ये असतील. यामध्ये सरकारच्या (government) कसल्याही प्रकारचा सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही, असे विभागाने (department) मान्यता आदेशात नमूद केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात होणाऱ्या बदलात समावेश होण्याची शक्यता विभागाने स्पष्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *