![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । संपाचा तिढा कायम असताना एसटी महामंडळाचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत. एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची निवड केली आहे.मात्र खासगीकरण हा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय असून त्यावर निर्णय झालेला नाही, अशी माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, “विविध पर्याय तपासण्याच्या सूचना सल्लागार कंपनीला दिल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना जे काही द्यायचे आहे ते एसटीचे उत्पन्न वाढवून द्यायचे आहे. त्यामध्ये एका बाजूला उत्पन्न वाढवून खर्च कसा कमी करता येईल याबाबत चर्चा झाली आहे.एसटी खासगीकरणाचा विचार आम्ही अजून केलेला नाही, पण वेगवेगळ्या पर्यायांमध्ये तोदेखील आहे. अद्याप शासनाने खासगीकरणाचा विचार केलेला नाही. कामगार त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत. सरकार म्हणून जशी कामगारांची आमची जबाबदारी आहे तशी लोकांचीदेखील आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागत आहे.
मी दररोज आवाहन करतो, पण कामगार भूमिकेवर ठाम आहे. विलीनीकरणाच्या भूमिकेवर न्यायालयाने नेमलेली समिती याबाबत निर्णय घेईल. त्याव्यतिरिक्त जे प्रश्न आहेत त्यासाठी चर्चेची दारे खुली आहेत. कोणत्याही युनियनचे कामगार ऐकत नाहीत. भाजपच्या नेत्यांचेही ते ऐकतात की नाही याबद्दल शंका आहे. कामगारांनी प्रतिनिधी ठरवावा. मी त्यांच्यांसोबत चर्चा करेन, असे परब म्हणाले.
दबावासाठी कंपनी : संप फोडण्यासाठी सरकार नेटाने 👈प्रयत्न करत आहे. सल्लागार कंपनी नेमणे त्याचाच एक भाग आहे. खासगीकरणाच्या भीतीने कर्मचारी कामावर येतील, अशी सरकारला आशा आहे. त्यामुळे आज संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबन व सेवा समाप्तीची जोरदार कारवाई महामंडळ प्रशासनाने केली.
१ शुक्रवारी एसटी महामंडळाने २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली, तर २९७ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. संपकाळात निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता २ हजार ७७६ वर पोचली. २ शुक्रवारी राज्यात २९ मार्गावर एसटी बसेस धावल्या. विविध आगारांतून १३१ बसेस बाहेर पडल्या तर त्यातून ३ हजार ५७६ प्रवाशांनी प्रवास केला.
आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार ! 😊विचारात पडलात ना ? 💶दररोजची वाढती महागाई,🏃दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग, 💊न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….! *तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा * आणि जगा चिंतामुक्त जीवन एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी ! 👉मेडिक्लेम व इन्शुरन्स
9226262899
