IND vs NZ: 2 वर्षांनी कोलकातामध्ये होणार मॅच ; BCCI अध्यक्ष सौरव गांगुली करणार तिसऱ्या मॅचची ओपनिंग,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand 2021) यांच्यात सध्या 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर रविवारी होणार आहे. टीम इंडियानं या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामनाही जिंकत क्लीन स्वीप करण्याची संधी भारतीय टीमला आहे. यापूर्वी दोन देशांमध्ये मागच्या वर्षी झालेली 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतही टीम इंडियानं क्लीन स्वीप मिळवला होता.

तब्बल दोन वर्षांनंतर कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मॅच होणार आहे. यापूर्वी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 2019 साली इथं डे-नाईट टेस्ट झाली होती. हा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांनाही परवनागी देण्यात आली आहे. त्यातच क्रिकेट फॅन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. BCCI अध्यक्ष आणि ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ सौरव गांगुली या मॅचची ओपनिंग करणार आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार गांगुली तिसऱ्या मॅचमध्ये घंटी वाजवून मॅचची सुरूवात करेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *