घर घेणे आता होणार महाग ; किमती वाढण्याची शक्यता; लोखंड, सिमेंटच्या दरात वाढ सुरूच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ नोव्हेबर । बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंड, सिमेंट तसेच इतर साहित्यात गेल्या दोन वर्षांत चढउतार सुरू होता. मात्र गेल्या काही महिन्यांत सतत वाढ होत असल्यामुळे बांधकामाच्या प्रति चौरस फुटांच्या दरावरही परिणाम झाला आहे. या वाढीमुळे घरांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे विकासकांचे म्हणणे आहे.

करोनाच्या सावटातून बांधकाम व्यवसाय बऱ्यापैकी सावरला आहे. मुद्रांक शुल्कात सवलत नसतानाही यंदा गेल्या दोन महिन्यांत विशेषत: दिवाळीत घरविक्रीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. त्यामुळे एकीकडे विकासकांची रोकडसुलभता वाढू लागलेली असतानाच लोखंड, सिमेंटसह इतर बांधकाम साहित्यातील वाढीमुळे आता ते चिंतेत आहेत. विकासकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ र्हौंसग इंडस्ट्रीज- कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एमसीएचआय-क्रेडाई) गेल्या वर्षभरापासून लोखंड व सिमेंटच्या वाढत्या किमतीकडे लक्ष वेधले होते. या किमती नियंत्रित करण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. परंतु त्या दिशेने केंद्र सरकारने काहीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे अखेरीस हा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी घरांच्या किमती वाढविण्याखेरीज पर्याय नाही, असे मत नरेडको महाराष्ट्रचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप रुणवाल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, लोखंड सिमेंटसह तांबे व अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीही वाढल्या आहेत. त्याचा परिणाम बांधकाम खर्चावर होत आहे. येत्या भविष्यात किमती कमी न झाल्यास, १० ते १२ टक्क्यांच्या जवळ खर्च वाढण्याची शक्यता आहे. याचा भार खरेदीदारांवर टाकला जाऊ शकतो. त्याचा परिणाम घरांच्या विक्रीवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link