महाराष्ट्र 24-अहमदाबाद
गुजरातच्या कच्छमध्ये चार जणांना हेरगिरीप्रकरणी अटक करण्यात आले आहे. कच्छमधील हवाई दलाच्या तळावर आरोपी फोटो काढत होते. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.
हवाई दलासंदर्भातील फोटो आणि गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवण्याच्या तयारीत होते असा अंदाज वायुसेनेच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रतिबंधीत क्षेत्रात हे चार लोक फोटो काढ होते. कायद्यानुसार हा गुन्हा आहे. त्यामुळे चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे पाकिस्तानचे हेर असू शकतात असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.