महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ नोव्हेंबर । देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी ऐतिहासिक उंची गाठली आहे. भारतात इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानंतर तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट पाहायला मिळू शकते. दरम्यान, भारतीय तेल कंपन्यांनी सलग 20व्या दिवशी पेट्रोल-डिझेच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. IOCL च्या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
पेट्रोलियम मंत्र्यांमध्ये मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळाली होती.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी भारत सरकारचा राखीव पेट्रोलियम साठ्यातून (स्ट्रैटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह) 50 लाख बॅरेल कच्चं तेल रिलीज केलं जाणार आहे. दरम्यान, हे रिलीज करण्यापूर्वी सरकार अमेरिका, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मोठ्या ग्राहकांचा विचार करण्यात येणार आहे.
विचारविनिमय केल्यानंतरच स्थलांतराबाबत काही पावले उचलली जातील. यामुळे बाजारात कच्च्या तेलाची उलब्धता वाढणार आहे आणि देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर कमी होऊ शकतात.
देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई 109.98 94.14
दिल्ली 109.69 98.24
कोलकाता 104.67 89.79
चेन्नई 101.40 91.43