लसूण खाऊन कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळता येतो का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली –
कोरोना व्हायरस जगभरातल्या अनेक देशांमध्ये पोहोचलाय आणि अजून तरी यावरचं औषध सापडलेलं नाही. पण असं असूनही अनेक प्रकारचे सल्ले सोशल मीडियावरून पसरतायत. खरंच या गोष्टी कोरोनाव्हायरसची बाधा टाळू शकतील का? संशोधक याबाबत काय म्हणतात? लसूण खाल्ल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही, असं सोशल मीडियाच्या अनेक पोस्टमध्ये म्हटलंय.

लसूण हा एक ‘आरोग्याला पोषक पदार्थ असून त्यामध्ये सूक्ष्म विषाणूंचा प्रतिरोध’ करण्याचे गुण काही प्रमाणात असले तरी लसूण खाल्याने कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळत असल्याचा कोणताही पुरावा नाही. अनेकदा या अशा उपचारांमुळे अपाय होत नाही. पण हे उपचार करत असल्याने जाणवणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी वैद्यकीय सल्ला घेणं टाळू नये. दक्षिण चीनमध्ये एका महिलेने तब्बल दीड किलो कच्चा लसूण खाल्याने तिच्या घशाला सूज आली आणि तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची पाळी आल्याची बातमी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिली आहे. फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश आणि भरपूर पाणी पिण्याचा एकूण निरोगी आरोग्यासाठी फायदा होतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण एखादी विशिष्ट गोष्ट खाल्याने कोरोना व्हायरसशी लढा देतो याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *