येत्या काळात भाजीपाला होणार स्वस्त, तज्ज्ञांचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ नोव्हेबर । Tomato Prices Increase: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबरडे मोडले आहे. टोमॅटोचे दर गगनाला भीडले आहेत. राज्यसह देशातील काही प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे दर 80 रुपये ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. दिल्ली, मुंबई, पुण्यामध्ये टोमॅटोचे दर हे 80 रुपये किलो झाले आहेत, तर चेन्नईमध्ये एक किलो टोमॅटोसाठी ग्राहकांना 160 रुपये मोजावे लागत आहेत. दक्षिण भारतातून येणाऱ्या टोमॅटोची आवक मंदावल्याने दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र येणाऱ्या काळात भाजीपाल्याचे भाव कमी होऊन काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तज्ज्ञंच्या मतानुसार सध्या दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी उच्चस्थरावर आहे. त्यामुळे धुक्याचे प्रमाण देखील वाढले आहे. वाढत्या धुक्यांमुळे दिल्लीत वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक ठप्प असल्याने बाहेरून येणारा भाजीपाला हा शहरात पोहोचू शकत नाही. तसेच दक्षिण भारतातून येणारी टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढले आहेत. मुंबई पुण्यासारख्या इतर शहरांमध्ये देखील आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे दिसून येतात. मात्र येणाऱ्या काळात दिल्लीतील प्रदूष कमी होऊन, वाहतूक पूर्ववत झाल्यास टोमॅटोचे दर कमी होई शकतील, तसेच पुढील महिन्यापासून दक्षिण भारतातून येणाऱ्या टोमॅटोची आवक वाढण्याचा अंदाज आहे. टोमॅटोची आवक वाढल्यास दर कमी होतील.

भाजीपाला महागला
देशात सध्या केवळ टोमॅटोच नाही तर सर्वच भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाट्याण्याचा भाव प्रति किलो 100 रुपयांवर पोहोचला आहे. कांदा 30 रुपये किलो तर बटाटा 40 रुपये किलोच्या भावाने विकत आहे. भाजीपाला अचानक महागल्याने ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत असून, गृहीनीचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ असल्याने वाहतूक खर्च देखील वाढला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याचे दर देखील वधारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *