![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ नोव्हेबर । आंतरराष्ट्रीय विमानसेवा नाताळपर्यंत पूर्ववत होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली होती. डिसेंबरच्या अखेरीस ती सर्व उड्डाणे सुरू होणार आहेत.
देशात कोरोना नियंत्रणात आला असून बहुतांश नागरिकांचे लसीकरणही झाले आहे. त्यामुळे अन्य देशांबरोबर चर्चेनंतर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत 25 देशांबरोबर त्यासंदर्भात बोलणी पूर्ण झाली आहेत.