‘या’ राज्यात जुनी वाहने ठेवणे होणार महाग; ग्रीन टॅक्समध्ये भरमसाठ वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 25 नोव्हेंबर । आंध्रप्रदेश सरकारने नुकतीच मोटार वाहन कर सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. नवा कायदा लागू झाल्यानंतर मोटार वाहन करामधून राज्य शासनाला वर्षाकाठी 409.58 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. या कायद्यामध्ये जुन्या वाहनांवर लावण्यात येणाऱ्या ग्रीन टॅक्समध्ये मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 2006 मध्ये राज्य सरकारने ग्रीन टॅक्स वाढवला होता. दक्षिण भारतामध्ये जुन्या वाहनांवर सर्वाधिक कर हा कर्नाटक राज्यामध्ये आकारला जातो. मात्र आता आध्रप्रदेश सरकाने मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2021 ला मंजुरी दिल्याने आध्रप्रदेश हो सर्वाधिक ग्रीन टॅक्स आकारनारे राज्य ठरणार आहे.

असा असेल नवा ग्रीन टॅक्स
नव्या ग्रीन टॅक्सनुसार 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या दुचाकींवर 2 हजारांचा कर आकारण्यात येणार आहे. तर 20 वर्षांपेक्षा अधिक जुन्या दुचाकी मालकांना 5 हजार रुपयांचा ग्रीन कर भरावा लागणार आहे. दरम्यान 15 वर्ष जुनी चारचाकी असल्यास तिच्यावर 5 हजार रुपयांचा कर आकारण्यात येईल. तर चारचाकी ही 20 वर्ष जुनी असल्यास तिच्यावर 10 हजारांचा कर आकारण्यात येईल.

…तर नवे वाहन खरेदी करताना करामध्ये मिळणार सूट
आपल्या 15 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या गाड्या स्क्रॅ्प केल्यास संबंधित वाहन मालकांना नवी गाडी खरेदी करताना टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा नुकतीच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यानुसार जर एखाद्या व्यक्तीने आपली गाडी स्क्रॅ्प केली तर त्याला मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारे करामध्ये 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला आळा बसल्यास मदत होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *