महागाईचा भडका :सर्व सामन्यांची चौफेर कोंडी ; सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ नोव्हेबर । :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असताना आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यात ही तिसरी दरवाढ आहे. सीएनजी प्रतिकिलो 3 रुपये 6 पैशांनी तर पीएनजी प्रतिकिलो 2 रुपये 6 पैशांनी महागला आहे. (CNG and PNG prices again increased)

देशात महागाईचा उच्चांक दिसून येत आहे. सर्वच वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर 900 रुपयांच्या पुढे केला आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही वाढ होताना दिसून येत आहे. आता दोन महिन्यांत तिसऱ्यांदा सीएनजी, पीएनजीची दरवाढ झाली आहे. सीएनजी प्रतिकिलो 3 रुपये 6 पैशांनी वाढला असून पीएनजी प्रतिकिलो 2 रुपये 6 पैशांनी वाढ झाली आहे. आता सीएनजी 61 रुपये 50 पैसे प्रतिकिलो झाला आहे.

महानगर गॅसने 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री सीएनजी आणि पीएनजी दराच्या मूळ किमतीत वाढ केली आहे. ती शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. ही वाढ सीएनजी प्रतिकिलो 3 रुपये 6 पैसे आणि पीएनजी प्रतिकिलो 2 रुपये 6 पैसे अशी आहे. त्यानुसार, सीएनजीच्या सर्व करांसहित सुधारित वितरण किंमत 61 रुपये 50 पैसे प्रतिकिलो, तर देशांतर्गत पीएनजी किंमत मुंबई आणि आसपास 36 रुपये 50 पैसे अशी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *