MHADA मध्ये ५६५ जागांची भरती; परीक्षेचे वेळापत्रक, पॅटर्न जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ नोव्हेबर । म्हाडामध्ये विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून आता परीक्षेच्या तारखा, परीक्षेचा पॅटर्न आणि उमेदवरांसाठी महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट जाऊन नोटिफिकेशन पाहता येणार आहे.

म्हाडाच्या या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या जागा भरल्या जाणार आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक
५ डिसेंबर (सकाळ सत्र) – क्लस्टर -७ (लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक, अनुरेखक
१२ डिसेंबर (सकाळचे सत्र) – कल्सटर -१ [कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (स्थापत्य)] क्लस्टर -३ (सहाय्यक निधी सल्लागार)
१२ डिसेंबर (दुपारचे सत्र) – क्लस्टर- ४ [(कनिष्ठ अभियंता, (स्थापत्य)

परीक्षा पॅटर्न
शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन ७ क्लस्टर्स बनविण्यात आले आहेत. एका क्लस्टरसाठी एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता या तीन संवर्गांचा समावेश एका क्लस्टरमध्ये करण्यात आला आहे. एक किंवा एकापेक्षा अधिक संवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

तांत्रिक आणि व्यावसायिक स्वरुपाच्या प्रश्नांचा अभ्यासक्रम अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. परीक्षेचे क्लस्टर, स्वरुप, प्रश्नसंख्या आणि गुणांचा तपशील वेबसाइटवर देण्यात आला आहे.

https://www.mhada.gov.in/en

रिक्त जागांचा तपशील
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)च्या १३ जागा, उप अभियंता (स्थापत्य)च्या १२ जागा, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारीच्या दोन जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य)च्या ३० जागा, सहायक विधी सल्लागारच्या २ जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)च्या ११९ जागा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायकच्या ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या ४४ जागा, सहाय्यकच्या १८ जागा, वरिष्ठ लिपिकच्या ७३ जागा, कनिष्ठ लिपिक-टंकलेखकच्या २०७ जागा, लघुटंकलेखकच्या २० जागा, भूमापकच्या ११ जागा आणि अनुरेखक पदाच्या ७ जागा रिक्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *