![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ नोव्हेबर । दोन दिवसांनंतर डिसेंबर महिन्याला सुरुवात होत आहे. डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व असते. डिसेंबरनंतर नव्या वर्षातील पहिल्या महिन्याला सुरुवात होते. साधारणपणे आपले आर्थिक वर्ष हे मार्चपर्यंत असते. त्यामुळे महत्त्वाच्या आर्थिक निर्णयाचे नियोजन त्या दृष्टीने करण्यात येते. मात्र डिसेंबर ते जानेवारी या काळात देखील काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असतात. जे की सामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या डिसेंबरमध्ये सामान्य नागरिकांशी निगडीत कोणते नियम बदलणार आहेत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊयात.
ईपीएफओकडून पीएफसाठी यूएएन नंबरला आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पीएफ जमा करण्यात येणार नाही, असे ईपीएफओकडून सांगण्यात आले होते. दरम्यान यूएएन आधार लिंकिंगसाठी यापूर्वीच मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याची मुदत वाढवून एक डिसेंबर 2021 करण्यात आली होती. आता मुदत वाढ मिळण्याची अपेक्षा नसल्याने, तुम्हाला येत्या तीन दिवसामध्ये यूएएनला आधार लिंक करावे लागेल, अन्यथा तुमचा पीएफ खात्यात जमा होणार नाही.
जर तुमचे आधार कार्ड यूएएनला लिंक नसेल तर तुमचे आणखी एक मोठे नुकसान होऊ शकते, एप्लॉईज डिपॉझिट लिंक्ड विम्यासाठी देखील ईपीएफओकडून आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर विम्याचा हप्ता देखील रोखण्यात येईल, आणि तुम्हाला विम्यापासून वंचित राहावे लागू शकते.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्यांकडून इंधनाच्या किमतीचा आढावा घेऊन, नवे दर जाहीर केले जातात. त्यानुसार पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किमती बदलण्याची शक्यता आहे. सध्या जगात कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. परिणामी बाजार पेठेवर दबाव असून, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.