Tata Motors ने Nexon SUV च्या किंमतीत दुसऱ्यांदा केली वाढ, ‘ही’ आहे नवीन किंमत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपली प्रसिद्ध एसयूव्ही ‘टाटा नेक्सन’च्या (Nexon) किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने दुसऱ्यांदा या एसयूव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे. याआधी देखील कंपनीने याच्या किंमतीत वाढ केली होती. Tata Motors ने दिलेल्या माहितीनुसार, कारच्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने सर्व कार निर्माता कंपन्या दर तीन महिन्यांनी आपल्या कारच्या किंमती वाढवत आहेत.

Tata Motors ने सांगितलं की, त्यांनी आपल्या नेक्सन एसयूव्हीच्या किंमतीत 11 हजार रुपयांनी वाढ केली आहे. कंपनीने याच्या डिझेल व्हेरिएंटच्या किंमतीत 11 हजार आणि पेट्रोल व्हेरिएंटच्या किंमतीत 10,500 रुपयांनी वाढ केली आहे. बाजारात ही एसयूव्ही प्युअर सिल्व्हर, फ्लेम रेड, डेटोना ग्रे, फॉलीएज ग्रीन आणि अॅटलस ब्लॅक रंग पर्यायसह उपलब्ध आहे. ही एसयूव्ही XE, XM, XZ+, XZ, XZ+(O) ट्रिम व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

टाटा नेक्सनमध्ये कंपनीने 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर टर्बो-डिझेल इंजिन अशा दोन पर्यायसह लॉन्च केली आहे. याचे पेट्रोल इंजिन 120hp ची पॉवर जनरेट करतो. तर याचे डिझेल इंजिन 110hp ची पॉवर जनरेट करतो. या एसयूव्हीची प्रारंभिक किंमत 7.29 लाख रुपयांपासून सुरु होते. जी 11.34 लाख रुपयांपर्यंत जाते. याच्या टॉप व्हेरिएंट XZ+ (O) डार्कची किंमत 11.34 लाख रुपये आहे.

हिंदुस्थानच्या बाजारात टाटा नेक्सनची स्पर्धा Hyundai Venue, मारुती विटारा ब्रिझा (Maruti Vitara Brezza), किया सोनेट (Kia Sonet) आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300) शी आहे. दरम्यान, टाटा नेक्सन ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *