early morning swearing : ‘पहाटेच्या शपथविधी’वर आजही पश्चात्ताप : देवेंद्र फडणवीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । राज्याचे माजी मुख्यंंमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दाेन वर्षांपूर्वी सत्ता स्थापनेसाठी (early morning swearing ) पहाटे शपथ घेतली होती. हा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्‍वपूर्ण घटना ठरली हाेती. आता या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक वृत्तसंस्थेला त्‍यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी हा पश्चात्ताप व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शिवसेनेने विश्वासघात केला म्हणून त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवार यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन केलं होतं. कारण, आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता. आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला, याचा आम्हाला पश्चात्ताप आहे. हे झालं नसतं तर चांगलं झालं असतं असं आम्हाला सारखं-सारखं वाटतं. मला माहिती त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केलं होतं”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“इतकंच नाही तर मी एक पुस्तक लिहिणार असून त्यात त्यावेळी कोणत्या घटना कशा घडल्या, याची सविस्तर माहिती देणार आहे”, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

महाविकास आघाडीवर (MAHA Politics) टीका करताना फडणवीस म्हणाले की, “राज्यात फक्त सरकार आहे, प्रशासन कुठे आहे. राज्यात कोरोनाची परिस्थितीदेखील योग्य हाताळली गेली नाही. राज्य सरकारने १० हजार मृत्यू लपवले आणि कोरोनाची स्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचे सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र, संपूर्ण देशातील मृत्यूचा विचार केला तर ३५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. हे सत्य ते स्वीकारत नाही”, अशी टीकाही फडणवीस यांनी ठाकरे सरकावर केली.

राज्य सरकार कोसळणार, असं वारंवार सांगितलं जात आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की,”सरकार जेवढं स्थिर दिसतं, तितकंच ते कोसळण्याची शक्यता अधिक असते. हे सरकार आपल्याच वजनाने खाली येईल”, असंही त्यांनी सांगितलं. फडणवीस यांच्या पश्चात्तापावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट प्रतिक्रिया येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *