बीडः समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या महेश मोतेवारला आज कोर्टात हजर करणार, 50 कोटींच्या लुटीचे प्रकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० नोव्हेंबर । देशभरात समृद्ध जीवन मल्टिस्टेट सोसायटीच्या माध्यमातून कमी काळात अधिक गुंतवणुकीचे अमिष दाखवून हजारो नागरिकांना गंडा घालणाऱ्या महेश मोतेवार (Mahesh Motewar) याची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सोमवारी पोलिसांच्या पथकाने पुण्यात जाऊन त्याच्या घराची झडती घेतली. मात्र त्यात कोणताही पुरावा सापडला नाही. बीड जिल्ह्यातील हजारो जणांची फसवणूक करून तब्बल 50 कोटी रुपयांचा गंडा (Fraud) घातल्याचा आरोप महेश मोतेवार (Mahesh Motewar) याच्यावर आहे.

2010 मध्ये समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या नावाखाली महेश मोतेवार याने देशभरात एजंटाचे जाळे तयार केले. कमी कालावधीत पैशांच्या गुंतवणुकीवर अधिक व्याजदाराने परतावा देण्याचे आमिष दाखवत त्याने कोट्यवधींच्या ठेवी जमवल्या होत्या. 2017 पर्यंत शाखा सुरळीत चालल्यानंतर एक दिवस अचानक शाखेला कुलूप लागले. जिल्ह्यातील हजार जणांचे 50 कोटींहून अधिक रुपये त्यात अडकले.

ईडीने यापूर्वीच महेश मोतेवार याचे बीडमधील घर आणि कार्यालय असलेले 11 गाळे सील केले आहेत. शहर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे चार वर्षानंतर शहर पोलिसांनी राजकोट कारागृहातून मोतेवार याला ताब्यात घेतले. त्याला सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत वाढ करम्यात आली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी संचालक मंडळाची यादी मागितली होती. मात्र ही यादी त्यांना मिळालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *